Edition

नेहा देसाई यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश; ‘एसएमए’सह दुर्धर आजारांचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई: स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी (एसएमए) सारख्या दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना मोफत आणि वेळेत उपचार मिळावेत यासाठी ‘जिजा सामाजिक संघटने’च्या नेहा देसाई यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर मोठे यश आले आहे. नेहा देसाई यांच्या पत्रव्यवहारानंतर आणि खासदार धैर्यशील माने यांच्या पुढाकाराने विधानभवनात पार पडलेल्या बैठकीत, अशा दुर्धर आजारांचा समावेश ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने’त करण्याचे महत्त्वाचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाला दिले.

नेहा देसाई या गेल्या अनेक वर्षांपासून एसएमए ग्रस्त रुग्णांच्या हक्कासाठी आणि त्यांना मोफत उपचार मिळण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत होत्या. त्यांनी यासंदर्भात शासनाला सविस्तर पत्रव्यवहार केला होता. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार धैर्यशील माने यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला.

बैठकीत नेहा देसाई यांनी मांडली रुग्णांची व्यथा
विधानभवनातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात आयोजित या उच्चस्तरीय बैठकीत नेहा देसाई यांनी ‘एसएमए’ आजाराची सद्यस्थिती, रुग्णांना भेडसावणाऱ्या अडचणी, महागड्या औषधांची उपलब्धता आणि उपचारांवरील प्रचंड आर्थिक भार यावर सविस्तर सादरीकरण केले.

नेहा देसाई यांनी मांडलेल्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यांची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाला खालील महत्त्वाचे निर्देश दिले:
• योजनेत समावेश: अत्यंत खर्चिक उपचारांमुळे कोणत्याही रुग्णाचे उपचार थांबून नयेत, यासाठी एसएमए सारख्या सर्व दुर्धर आजारांचा समावेश ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने’त करावा.
• स्वतंत्र एसओपी: एसएमए आजाराच्या लवकरात लवकर निदानासाठी, रुग्ण नोंदणीसाठी आणि तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या औषधांच्या सुलभ उपलब्धतेसाठी स्वतंत्र कार्यपद्धती (SOP) तयार करावी.
• वाडिया रुग्णालयाला दर्जा: मुंबईतील वाडिया बालरुग्णालयाला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे आवश्यक प्रस्ताव पाठवावा.
• जीवनावश्यक औषधांची खरेदी: केईएम रुग्णालयाने या दुर्धर आजारावरील औषधांचा समावेश जीवनावश्यक औषध यादीत करून त्यांची खरेदी करावी, जेणेकरून रुग्णांना औषधे वेळेत मिळतील. तसेच एसएमए रुग्णांना Risdiplam हे औषध मोफत दिल जाणार आहे.

आपल्या अनेक वर्षांच्या लढ्याला आणि प्रयत्नांना सकारात्मक यश आल्यानंतर नेहा देसाई यांनी समाधान व्यक्त केले. रुग्णांच्या कुटुंबीयांवरील आर्थिक भार हलका करणारा हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशील माने आणि आरोग्य विभागाचे विशेष आभार मानले आहेत.

या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य आयुक्त संजय काटकर, वाडिया रुग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ डॉ. अनीष ऐनापुरे, केईएम रुग्णालयाच्या सह अध्यापिका डॉ. प्रग्या जोशी, क्लीनिकल रिसर्च स्पेशालिस्ट डॉ मिलिंद बागुल, दिपाली जाधव यांच्यासह जिजा सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

हिरेकुडी येथील ज्येष्ठ नागरिक जयपाल नरसप्पा बाळीकाई यांचे आकस्मिक दुःखद निधन.मलिकवाड येथील जैन मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या धार्मिक व दानशूर व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली!*

traffic tail

हिरेकुडी येथील ज्येष्ठ नागरिक जयपाल नरसप्पा बाळीकाई यांचे आकस्मिक दुःखद निधन.मलिकवाड येथील जैन मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या धार्मिक व दानशूर व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली!*

error: Content is protected !!