Edition

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डॉ. रईसा मुल्ला यांना पीएच.डी. पदवी प्रदान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या विभागप्रमुख डॉ. रईसा मुल्ला यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी येथून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यांचा संशोधन विषय “मशीन लर्निंगचा वापर करून मधुमेही आणि मधुमेह नसलेल्या रुग्णांमधील कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूच्या जोखमीचे मूल्यांकन”
असा होता. या संशोधनासाठी त्यांना भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. के. आर. देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. या संशोधनामध्ये कोविड संसर्गाचा मधुमेही तसेच मधुमेह नसलेल्या रुग्णांवर होणारा परिणाम आणि त्यांच्यातील मृत्यूची संभाव्य जोखीम यांचा मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या आधारे अभ्यास करण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.

डॉ. रईसा मुल्ला यांच्या या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

हिरेकुडी येथील ज्येष्ठ नागरिक जयपाल नरसप्पा बाळीकाई यांचे आकस्मिक दुःखद निधन.मलिकवाड येथील जैन मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या धार्मिक व दानशूर व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली!*

traffic tail

हिरेकुडी येथील ज्येष्ठ नागरिक जयपाल नरसप्पा बाळीकाई यांचे आकस्मिक दुःखद निधन.मलिकवाड येथील जैन मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या धार्मिक व दानशूर व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली!*

error: Content is protected !!