Edition

चुलत्याचे १५ तोळे सोने चोरून पुतण्याने खरेदी केली थार! उद्घाटनाला चुलत्यालाच बोलावलं, पण एका गोष्टीने चोरीचा भांडाफोड केला!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर प्रतिनिधी :प्रविण केर्ले

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातून नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या १९ वर्षांच्या समर चव्हाण याने स्वतःच्या चुलत्याच्या घरातून १५ तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. या दागिन्यांची विक्री करून मिळालेल्या पैशांत त्याने चक्क नवी कोरी थार गाडी खरेदी केली. विशेष म्हणजे, गाडीच्या उद्घाटनासाठी त्याने चुलत्यालाच आमंत्रित केलं होतं. मात्र, त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, समर चव्हाण हा पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात राहतो. त्याचे चुलतेही त्याच्या घराशेजारीच राहत असल्याने समरचे त्यांच्या घरी नेहमी येणं-जाणं असायचं. याच ओळखीचा फायदा घेत त्याने चुलत्याच्या घरातील १५ तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे.

चोरी केलेले दागिने त्याने गावातील एका सोनाराला विकले. त्यातून मिळालेल्या सुमारे १० लाख रुपयांत त्याने स्वतःसाठी नवी कोरी थार गाडी खरेदी केली. गाडी आल्यानंतर त्याने तिच्या उद्घाटनासाठी आपल्या चुलत्यालाही बोलावलं.

पुतण्याने एवढी महागडी गाडी खरेदी केल्याचं पाहून चुलतेही आनंदी झाले. गाडीच्या उद्घाटनाला जायचं असल्याने त्यांनी घरातील दागिने घालण्याचं ठरवलं. मात्र, दागिने शोधायला गेल्यावर त्यांना मोठा धक्का बसला.

त्यांच्या घरातील १५ तोळे सोन्याचे दागिने गायब होते. विशेष म्हणजे, शेजारी ठेवलेले आजीचे दागिने मात्र सुरक्षित होते. केवळ चुलते आणि त्यांच्या पत्नीचे दागिने गायब झाल्याने त्यांना घरातीलच एखाद्या व्यक्तीवर संशय आला.

पुतण्याच्या नव्या थारचा आनंद साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच घरातील दागिने चोरीला गेल्याचं उघड झालं आणि प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. या प्रकरणात समर चव्हाण याच्यावर चोरीचा आरोप असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

‘माझी संस्कृती, माझा अभिमान’; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्यांची किल्ले उभारण्यासाठी धडपड! तारदाळ खोतवाडी मातीच्या किल्ल्यांतून साकारतोय शिवशाहीचा इतिहास; गड-किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी बालचमूंचा उत्साह

traffic tail

‘माझी संस्कृती, माझा अभिमान’; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्यांची किल्ले उभारण्यासाठी धडपड! तारदाळ खोतवाडी मातीच्या किल्ल्यांतून साकारतोय शिवशाहीचा इतिहास; गड-किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी बालचमूंचा उत्साह

error: Content is protected !!