Edition

गोकुळ अध्यक्ष निवडीआधी राजकीय हालचालींना वेग; दोन्ही गटांचे संचालक सहलीवर! समविचारी आघाडीचे १३ संचालक सहलीवर; महायुतीचे संचालकही गोव्याला रवाना

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर | प्रतिनिधी-प्रविण केर्ले

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे १३ संचालक सहलीवर गेले असून, महायुतीचे १२ संचालकही गोव्याला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

अध्यक्ष निवडीसाठी कोरमचा पेच

गोकुळच्या २५ संचालकांच्या निवडणुकीत समविचारी आघाडीने १३, तर महायुतीने १२ जागा जिंकल्या आहेत. अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी आवश्यक असलेली उपस्थिती आणि दोन्ही गटांचे संख्याबळ यामुळे या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे संचालकांची एकजूट कायम ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंकडून हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

२९ ऑक्टोबरच्या निवडीकडे लक्ष

गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड २९ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असल्याचे वृत्त आहे. अध्यक्षपदासाठी कोणाला संधी मिळणार, निवड प्रक्रियेत कोणती राजकीय समीकरणे आकाराला येणार आणि संचालकांची भूमिका काय राहणार, याकडे सहकार क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याचा फैसला निवड प्रक्रियेत होणार असल्याने राजकीय वर्तुळातील उत्सुकता वाढली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

traffic tail
error: Content is protected !!