Edition

ऊस दराची कोंडी कायम; कोल्हापुरातील बैठक निष्फळ पहिल्या उचलीवर तोडगा नाही; नदीपात्रे कोरडी पडल्याने शेतकरी दुहेरी संकटात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर (प्रतिनिधी) :प्रविण केर्ले
रखडलेल्या ऊस दराचा प्रश्न आणि आगामी गळीत हंगामाबाबत तोडगा काढण्यासाठी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होऊनही ऊस दराचा अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता पहिल्या उचलीच्या घोषणेकडे लागले आहे.

बैठकीला कारखानदारांच्या वतीने राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि माजी खासदार संजय मंडलिक उपस्थित होते. यावेळी साखरेचे अर्थकारण, साखरेचे किमान विक्री मूल्य (MSP) प्रतिकिलो ५० रुपये करण्याची मागणी, वाढलेला ऊस उत्पादन खर्च आणि घटलेला साखर उतारा या मुद्द्यांवर चर्चा झाली.

पहिली उचल जाहीर करण्याची मागणी

यंदा उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांना घसघशीत पहिली उचल जाहीर करावी, अशी आग्रही मागणी राजू शेट्टी यांनी केली. मात्र, बैठकीत दराबाबत अंतिम निर्णय न झाल्याने ऊस दराची कोंडी कायम आहे.

कर्नाटकातील बैठकीकडे लक्ष

कर्नाटकात २६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीतील निर्णयाचा सीमाभागातील ऊस दराच्या चर्चेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पाणीटंचाईने शेतकरी चिंतेत

दुसरीकडे, गळीत हंगाम वेळेत सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतीपंपांवर उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. धरणांतून नदीपात्रात पाणी सोडणे बंद झाल्याने अनेक ठिकाणी नदीपात्रे कोरडी पडली आहेत. त्यामुळे ऊस दराचा प्रश्न अनिर्णित असतानाच सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.

आता कारखानदार पहिली उचल किती जाहीर करतात आणि त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणती भूमिका घेते, याकडे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

‘माझी संस्कृती, माझा अभिमान’; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्यांची किल्ले उभारण्यासाठी धडपड! तारदाळ खोतवाडी मातीच्या किल्ल्यांतून साकारतोय शिवशाहीचा इतिहास; गड-किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी बालचमूंचा उत्साह

traffic tail

‘माझी संस्कृती, माझा अभिमान’; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्यांची किल्ले उभारण्यासाठी धडपड! तारदाळ खोतवाडी मातीच्या किल्ल्यांतून साकारतोय शिवशाहीचा इतिहास; गड-किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी बालचमूंचा उत्साह

error: Content is protected !!