Edition

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला ‘सीफोर स्कूल एक्सलन्स अवॉर्ड 2026′ शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर, : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या शैक्षणिक व सहशालेय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत ‘सीफोर स्कूल एक्सलन्स अवॉर्ड 2026’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने शाळेला गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर, द्वारका येथे २३ सप्टेंबर रोजी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

देशभरातील शिक्षणतज्ज्ञ, शैक्षणिक संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने संचालिका सस्मिता मोहंती व बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच एम नवीन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या पुरस्काराचे वितरण माजी सीबीआय संचालक श्री. कार्तिकेयन, माजी निमहंस प्राध्यापक डॉ. शेखर शेषाद्री, सिफोरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेमचंद पालेटी, ब्रेनफीड मॅगझीनचे संपादक के. व्ही. ब्रह्मम, तसेच डॉ. जे. एस. परंजोथी आणि श्री. मनोज शर्मा या शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्याची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली. या राष्ट्रीय स्तरावरील सन्मानामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, असे मत संचालिका अस्मिता मोहंती यांनी व्यक्त केले. चेअरमन संजय घोडावत विश्वस्त, विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती यांनी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचे अभिनंदन केले व आभार व्यक्त केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!