Edition

चंदगड, अडकूर बाजारपेठेत अन्न-औषध प्रशासनाचे छापे; अनेक दुकानदारांची धावपळ.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी – चंदगड : अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) विशेष तपासणी पथकाने बुधवारी चंदगड व अडकूर परिसरातील विविध हॉटेल्स, बेकरी, चायनीज सेंटर तसेच खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांवर अचानक छापे टाकून तपासणी केली. या कारवाईमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये काही काळ खळबळ उडाली.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नेसरी ते चंदगड मार्गावरील अडकूर येथील बाजारपेठेत तपासणीला सुरुवात करण्यात आली. यावेळी काही हॉटेल्स व बेकरी दुकानांमध्ये विविध खाद्यपदार्थांचे नमुने घेण्यात आले. तसेच आवश्यक त्या ठिकाणी गैरप्रकारांविरोधात तातडीच्या सूचना देण्यात आल्या.

अचानक झालेल्या कारवाईची माहिती परिसरात पसरताच काही दुकानदारांनी आपली दुकाने काही काळासाठी बंद केली. त्यानंतर दुपारनंतर चंदगड शहरातील मुख्य गुरुवार पेठ परिसरातील हॉटेल्स, टी स्टॉल, बेकरी आणि चायनीज सेंटरवरही तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान खाद्यपदार्थांचे नमुने घेण्यात आल्याची माहिती आहे.

अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता तसेच नियमांचे पालन याबाबत प्रशासनाकडून तपासणी करण्यात आली. कारवाईदरम्यान काही दुकानदारांची धावपळ उडाली. यापूर्वीही शिनोळी व माजरे कार्वे परिसरात छापे टाकून कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अन्न व औषध प्रशासनाच्या या अचानक कारवाईमुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली असून, नियमांचे पालन करण्याबाबत प्रशासनाने व्यावसायिकांना सतर्क केले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!