Edition

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस दुप्पट रक्कम व ६ महिने कारावासाची शिक्षा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : धनादेश अनादर प्रकरणात सेलूच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. गौरव तराळ यांनी आरोपीला धनादेशाच्या दुप्पट रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्याचे व ६ महिन्याच्या कारावासाची शिक्षा दिनांक १६/०९/२०२६ रोजी सुनावली आहे. घटनेची हकीकत अशी की, भारत तुकाराम रोडगे यांच्याकडून आसाराम तुकाराम गाडेकर यांनी हात उसने ३,१०,०००/- रुपये घेतले होते. त्या बदल्यात त्यांनी धनादेश दिला होता. भारत रोडगे यांनी धनादेश बँकेत जमा केला असता खात्यात पैसे नसल्यामुळे धनादेश अनादर झाला. त्यामुळे भारत रोडगे यांनी आसाराम गाडेकर यांच्या विरुद्ध धनादेश न वटल्याप्रकरणी विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग सेलू येथे १३८ एन.आय. ॲक्ट अंतर्गत प्रकरण दाखल केले होते.सदर प्रकरणात वादीचा पुरावा व वादीच्या वकीलाचा युक्तीवाद ऐकून विद्यमान न्यायालयाने आरोपीस धनादेशाच्या दुप्पट रक्कम ६,२०,०००/- रुपये १ महिन्यात फिर्यादीस नुकसान भरपाई द्यावी, व रक्कम न दिल्यास २ महिन्याची साधी कारावासाची शिक्षा तसेच ६ महिन्याच्या कारावासाची शिक्षा सेलूचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. गौरव तराळ यांनी सुनावली.
फिर्यादी भारत रोडगे यांच्या वतीने ॲड. एल.एच. खोना यांनी काम पाहिले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!