Edition

सदलगा येथे आदर्श को-ऑप क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.संस्थेला ४० लाख ८ हजार रुपयांचा नफा; अध्यक्ष श्री.अमोल पाटील यांची माहिती सभासदांना २० टक्के लाभांश देण्याची घोषणा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सदलगा प्रतिनिधी – सदलगा( ता.चिकोडी )येथील आदर्श को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी संस्थेने आर्थिक वर्षात ४० लाख ८ हजार ९६९ रुपयांचा निव्वळ नफा कमावल्याची माहिती देण्यात आली. तसेच सभासदांना २० टक्के लाभांश (डिव्हिडंड) देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सर्व उपस्थितांनी उभे राहून राष्ट्रगीताने केली. त्यानंतर संस्थेच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदलगा मुख्य शाखेचे संस्थापक, संस्थापक अध्यक्ष, संचालक मंडळाचे सर्व सदस्य तसेच विविध शाखांच्या सल्ला समिती सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली.

संस्थापक श्री. बाहुबली राजेंद्र कलाजे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संस्थेकडून सभासदांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देताना, इतर बँकांच्या तुलनेत कमी व्याजदरात सोने तारण कर्जाची सुविधा तसेच २० टक्के डिव्हिडंड आदी योजनांचा उल्लेख त्यांनी केला.

संस्थापक अध्यक्ष श्री. अमोल भूपाल पाटील यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले.
जनरल मॅनेजर श्री.संतोष मडिवाळ यांनी नफा-तोटा पत्रक सादर केले. संचालक श्री. प्रवीण गिडगल्ले यांनी लेखापरीक्षक नेमणूक तसेच संस्थेच्या आर्थिक व संस्थात्मक प्रगतीबाबत सविस्तर माहिती दिली.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कारसंस्थेच्या संचालक मंडळ व मुख्य शाखा सल्ला समितीच्या वतीने प्रौढ शाळेचे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेले श्री. बसवराज अण्णाप्पा मुत्नाळे, श्री. अजित अण्णाप्पा धुळसावंत, तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री. कलगौडा बाळगौडा पाटील तसेच शिक्षक म्हणून निवृत्त झालेले श्री. नरसू बंडू जुगळे यांचा सत्कार करण्यात आला.

महिला सोसायटीच्या संचालक मंडळाच्या वतीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स सन्मान प्राप्त केलेल्या कु. वचना वीरेश पाटील, कु. अध्यात्म प्रमोद सदलगे, खेलो इंडिया तायक्वांदो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या कु. भक्ती संतोष बोटे तसेच दहावीच्या परीक्षेत कर्नाटक राज्यात सातवा क्रमांक मिळवलेल्या कु. प्रगती सागर लट्टीमरडी यांचा गौरव करण्यात आला.

विविध शाखांतील गुणवंतांचा गौरवबांबळवाड व मुघळी शाखा : श्री. बाळासाहेब भरमू तेरदाळे, श्री. रमेश रामप्पा खोत, श्री. मोहन अण्णाप्पा डकरे यांचा सत्कार करण्यात आला.चिंचणी व पट्टणकुडी शाखा : श्री. गणेश संजय नाजरे, श्री. मौला शाजिबा शितोळे, श्री. सागर देवू गिडगल्ले यांचा गौरव करण्यात आला.

कब्बूर व काडापूर शाखा : कुमार साजिद अस्लम जमादार, श्री. संतोष सुरेंद्र गोरवाडे, श्री. अशोक बाबू बाजके यांचा सत्कार करण्यात आला.

रायबाग व सदलगा शाखा : NEET परीक्षा उत्तीर्ण होऊन MBBS अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवलेल्या कुमार स्वयम बाबू बाकळे, कुमार सोहम सुभाष महाजन आणि कुमारी प्राची दादा पाटील यांचा संचालक व सल्ला समिती सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शेवटी महिला सोसायटीच्या अध्यक्षा चि.सौ.कां. संध्या बाहुबली कलाजे यांनी उपस्थितांचे आभार मानून सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

 

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!