Edition

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन प्राथमिक शाळा चे घवघवीत यश.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : दि. 27 जुलै नूतन प्राथमिक शाळा सेलू,च्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत 24 विद्यार्थ्यांनी घवघवीत असे यश मिळवत शाळेच्या लौकिकात भर पाडली. याप्रसंगी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा पालका समवेत सत्कार करण्यात आला.
सत्कार करताना शालेय शिक्षक ज्येष्ठ शिक्षक प्रशांत सावरगावकर, एकनाथ जाधव सर, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख अर्जुन पंडित सर, तसेच सोनाली कुबरे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.
शाळेतील गुणवंत विद्यार्थी खालील प्रमाणे.
1) प्रथम-भुतडा समृद्धी जय किशन(290गुण)
२) द्वितीय-अजय अमोल लाटे (236गुण)
3) तृतीय-दरेकर प्रांजल महादेव. (222गुण)
४) चौथ्या -भुक्तर पनिका दिपक.(198गुण)
या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ एस एम लोया, उपाध्यक्ष डी के देशपांडे सचिव डॉ व्हि. के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहानी, प्रशासकीय अधिकारी डॉ शरद कुलकर्णी, कार्यकारणी सदस्य नंदकिशोरजी बाहेती यांनी मुख्याध्यापक उल्हास पांडे सह सर्व शिष्यवृत्ती विभागातील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!