Edition

पद्मशाली शिक्षण संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग
पद्मशाली पंच कमिटी अंतर्गत कार्यरत पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने इयत्ता 10 व 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ गंजपेठ टिंबर मार्केट येथील सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये उत्साहात संपन्न झाला.
यावेळी इयत्ता 10 वी व 12 वीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना लॅपटॉप बॅग, पेन, पुस्तक व मोबाईल स्टॅन्ड भेट देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष शंकर गडृम, उपाध्यक्ष विनायक तुम्मा, राजेश कट्टा, जनरल सेक्रेटरी विनोद अंकम, सेक्रेटरी सत्यनारायण कंदुल, खजिनदार ललित चिंतल, विष्णू मंत्री, सदस्य पुरुषोत्तम कटकम, साई यन्नम, अशोक कटकम, विजय वन्नम, सूर्यकांत मेरगु, यशवंत अंकम, विशाल पासकंटी, गिरीश गाजेंगी, प्राची झंपल,आदी यावेळी उपस्थित होते.
सूत्रसंचालन शरयू मंत्री लोणकर व केदार लोणकर यांनी केले.
तर आभार ललित चिंतल यांनी मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!