Edition

घोसरवाड येथील अनिल रामचंद्र बाबर यांचे दुःखद निधन; बाबर कुटुंबावर शोककळा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशालक्रांती न्यूज | प्रतिनिधी : अमर माने,

घोसरवाड (ता.शिरोळ,जि. कोल्हापूर) येथील रहिवासी श्री. अनिल रामचंद्र बाबर (वय 57) यांचे मंगळवार, दि.14 जुलै रोजी सकाळी आकस्मिक दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच घोसरवाड व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून बाबर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

श्री.अनिल बाबर हे मनमिळावू व शांत स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात आई व दोन मुले असा परिवार आहे.
त्यांचे रक्षाविसर्जन बुधवार, दि.15 जुलै रोजी सकाळी 8.00 वाजता होणार आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!