Edition

मांगले–सावर्डे बंधाऱ्यावर भराव टाकण्याचे काम सुरू..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली प्रतिनिधी – वारणा नदीवरील पुरामुळे नुकसान झालेल्या मांगले–सावर्डे बंधाऱ्याच्या परिसरात आता भराव टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पुराच्या पाण्याच्या वेगामुळे बंधाऱ्यालगतचा रस्ता, संरक्षण भिंत आणि परिसरातील काही भागाचे मोठे नुकसान झाले होते.
सध्या संबंधित यंत्रणेकडून जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने भराव टाकून बंधारा व संपर्क मार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे भविष्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर बंधाऱ्याची सुरक्षितता वाढण्यास मदत होणार असून परिसरातील नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे.
स्थानिकांनी काम लवकर पूर्ण करून वाहतूक आणि इतर सुविधा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!