विशाल क्रांती वृत्तसेवा टाकळीवाडी –
सावित्री महिला बचतगटच्या अध्यक्षा ललिता बदामे यांनी बचतगटच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.त्यांनी टाकळीवाडी गावातील महिलांचा मेळावा घेतला.यातून महिलांना बचतीचे महत्त्व, लघु व्यवसाय याबद्दल तज्ञांकडून मार्गदर्शन केले. सोनाई महिला दुध संस्थेच्या संचालिका या पदावर असून संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुध व्यवसाय वृद्धीसाठी कमी खर्चात उत्पादनात वाढ करुन जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवावे याबाबत व्याख्यान घेऊन गावातील दुध व्यवसाय वाढविला आहे.या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासन महिला बालविकास विभागाच्या अंतर्गत ग्रामपंचायत टाकळीवाडी यांच्या वतीने ललीता बदामे यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात आला.सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असुन यासाठी पती- सुखदेव, चिरंजीव -अदित्य,सासु-मालुताई, सासरे-दत्तात्रय, कुटुंबाचे, गावकऱ्यांचे नेहमीच सहकार्य असल्याचे सांगतात.
पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते रमेशकुमार मिठारे, भाग्यश्री मिठारे यांनी ललीता बदामे यांचा शाल, बुके देऊन विशेष सत्कार केला.यावेळी सुखदेव बदामे,संजय बदामे यांच्यासह बदामे परिवार उपस्थित होते.









