Edition

यादनवाडीतील 30 वर्षांच्या शैक्षणिक सेवेला मानाचा मुजरा; कु.एस.बी.माने मॅडम यांना निरोप.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशाल क्रांती प्रतिनिधी – अमर माने मलिकवाड – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल ३० वर्षे अविरतपणे कार्यरत राहिलेल्या यादनवाडी येथील शासकीय वरिष्ठ प्राथमिक कन्नड शाळेच्या शिक्षिका कु. एस. बी. माने मॅडम यांना मुख्याध्यापिका पदावर पदोन्नती मिळाल्याने त्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला.

शाळेतील शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती (एसडीएमसी), माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात माने मॅडम यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माने मॅडम यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रभारी मुख्याध्यापिका सौ. पी. एस. रोगे मॅडम यांनी प्रास्ताविकातून माने मॅडम यांच्या तीस वर्षांच्या सेवाकाळातील शैक्षणिक योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. सौ. पी. सी. सांगावे मॅडम यांनी मनोगतातून त्यांच्या विद्यार्थीहिताच्या कार्याचे कौतुक केले, तर विद्यार्थिनी कु. स्वाती काशीनाथ खोत हिने विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त करताना माने मॅडम यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त केले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी संघ, पालक व ग्रामस्थांच्या वतीने कु. एस. बी. माने मॅडम यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेटवस्तू देऊन भव्य सत्कार करण्यात आला. तसेच नव्याने रुजू झालेल्या सौ. पद्मश्री एस.रोगे मॅडम आणि श्री. नामदेव माळी सर यांचेही स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमात निवृत्त मुख्याध्यापक श्री. तळवार सर तसेच एकसंबा सीआरसी अंतर्गत कार्यरत विविध शाळांच्या मुख्याध्यापकांचाही सत्कार करण्यात आला. श्री. तळवार सर आणि श्री. आय. एम. नदाफ सर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

सत्काराला उत्तर देताना कु. एस. बी. माने मॅडम यांनी शाळा, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि सहकारी शिक्षक यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या सेवाकाळात मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास स्थानिक मान्यवर, पालक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नामदेव माळी सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. पी. सी. सांगावे मॅडम यांनी केले. भावनिक वातावरणात संपन्न झालेल्या या निरोप समारंभाने उपस्थितांच्या मनात कु. एस. बी. माने मॅडम यांच्याबद्दलचा आदर आणि स्नेह अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!