- यड्राव (प्रतिनिधी ) – अनेक फायनांस कंपन्यांच्या नावाखाली काही रेपो एजंट वाहनधारकांना रस्त्यात अडवुन धमकावुन जबरदस्तीने व शिवीगाळ करून दुचाकी व चारचाकी वाहने ताब्यात घेतले जातात अनेक वेळा एजंटाकडुन अधिकृत ऒळखपत्र किंवा वाहन जप्तीचे आदेश न घेता जबरदस्तीने वाहने ताब्यात घेतात वाहनधारकाला कोनतीही पुर्व कल्पना न देता रस्त्यात अडवुन वाहन ताब्यात घेताल्यामुळे वाहनधारकांना मानसिक शारीरिक त्रास व एजंटाकडुन अपमानजनक भाषा वापरल्यामुळे वाहनधारक संतप्त होतात सध्या जयसिंगपूर व परिसरामध्ये अनधिकृत रेपो एजंटाकडुन धमकावून जबरदस्तीने वाहन काढुन घेण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत त्यामुळे
अनधिकृत रेपो एजंटकडून वाहनधारकांना रस्त्यात अडवुन वाहने जप्त करण्याच्य बेकायदेशीर प्रकारांवर कारवाई करणेबाबत तसेच अशा घटनांची तक्रार प्राप्त झालेस त्वरित गुन्हा नोंदवुन तपास करावा असे जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक गोरे यांना निवेदन
देण्यात आले
यावेळी तालुकाध्यक्ष संजय शिंदे दादा, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अब्दुल बागवान, युवा शहराध्यक्ष सचिन कांबळे, शहराध्यक्ष दिपक शेडबाळे, उपाध्यक्ष उमेश मोरे,सदस्य शेखर मादर,सुरज पाटील.











