Edition

मलिकवाड ग्रामपंचायतीत ऑनलाइन उतारा सेवा रखडली; नागरिकांच्या संतापाचा उद्रेक.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

  1. चिकोडी प्रतिनिधी – कर्नाटक शासनाच्या डिजिटल उपक्रमांतर्गत ऑनलाइन उतारा सेवा राज्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये सुरू झाली असली तरी चिकोडी तालुक्यातील मलिकवाड ग्रामपंचायतीत ही सेवा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रखडल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

परिसरातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये ऑनलाइन उतारा सहज उपलब्ध होत असताना मलिकवाड येथे ही सुविधा अद्याप कार्यान्वित झालेली नाही. याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार चौकशी करूनही संबंधित अधिकारी व कर्मचारी “सेवा सुरू झालेली नाही” असे सांगून नागरिकांना परत पाठवत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

ऑनलाइन उतारा हा मालमत्तेशी संबंधित महत्त्वाचा दस्तऐवज असून बँक कर्ज, मालमत्ता नोंदणी, शासकीय योजना तसेच विविध प्रशासकीय कामांसाठी त्याची आवश्यकता असते. मात्र सेवा उपलब्ध नसल्यामुळे अनेकांची कामे रखडली असून नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.

प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मलिकवाड ग्रामपंचायतीत ई-सेतू उतारा सेवा तात्काळ सुरू करावी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

“मोजणीला आले तर रक्त सांडू”: ऐतवडे खुर्दचा शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध, शेतकरी नेते हनुमंत पाटलांचा सरकारला थेट इशारा.. 2019 च्या महापुरात 85% गाव पाण्याखाली, महामार्ग झाला तर 100% गाव बुडणार; “आम्ही आत्महत्या करणार नाही, लढू” – भूमिहीन होण्याच्या भीतीने शेतकरी आक्रमक.

traffic tail
error: Content is protected !!