Edition

बेडकीहाळच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवावरील ‘विशाल क्रांती’च्या विशेष पुरवणीचे अनावरण!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जत्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांकडून पुरवणीचे कौतुक; पत्रकार राजू संकपाळ यांच्या प्रयत्नांचे विशेष अभिनंदन.

प्रतिनिधी राजू संकपाळ बेडकीहाळ,

कर्नाटकातील,  दुसऱ्या क्रमांकाचा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेडकीहाळ येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या साप्ताहिक विशाल क्रांतीच्या विशेष पुरवणीचे अनावरण मंगळवारी (ता. २१) दसरा जत्रा कमिटीच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी जत्रा कमिटीचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते

पुरवणीचे अनावरण केल्यानंतर मलगोंडा पाटील म्हणाले, की बेडकीहाळच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाची परंपरा, महत्त्व आणि विविध पैलूंची माहिती या पुरवणीतून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. पत्रकार राजू संकपाळ यांनी विशेष प्रयत्न करून दसरा महोत्सवाची सविस्तर माहिती वाचकांसमोर आणली आहे. ही पुरवणी अतिशय उत्तम असून तिचे विशेष कौतुक करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

 

जत्रा कमिटीचे अध्यक्ष सुनील नारे म्हणाले, की यंदाचा दसरा महोत्सव ११ ते २३ ऑक्टोबरदरम्यान साजरा होत आहे. महोत्सवानिमित्त गावात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून विविध दुकाने, स्टॉल्स, मनोरंजनासाठी पाळणे, खेळण्यांचे स्टॉल, विविध स्पर्धा आणि नाटकांसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.

साप्ताहिक विशाल क्रांतीने प्रकाशित केलेली विशेष पुरवणी दसरा महोत्सवाच्या इतिहासाची आणि परंपरेची माहिती देणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पुरवणी प्रसिद्ध केल्याबद्दल कमिटीच्या वतीने आभार मानले.

यावेळी मलगोंडा चुरकुटे, अशोक आरगे, पांडुरंग आंबे, शेवट बेनाडे, तातू केस्ते यांच्यासह जत्रा कमिटीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

traffic tail

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

error: Content is protected !!