Edition

राज्यातील जनतेला आरोग्य विषयक सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी कटिबद्ध – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गारगोटी : दि २१
राज्यातील जनतेला सर्वोत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे उभारण्यात आलेल्या विशेष नेत्र रुग्णालयाचे लोकार्पण तसेच अद्ययावत कॅथलॅबच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्याक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर श्रीमती सारिका नांदेकर आरोग्य सभापती (जि.प) गोकुळचे संचालक मदन देसाई,कल्याणराव निकम, नंदकुमार ढेंगे, बाबा नांदेकर, बाजीराव चव्हाण,उपसंचालक डॉ दिलीप माने,सहसंचालक मुंबई – डॉ सुनीता गोल्हेत, डॉ .संजय रणवीर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सरिता थोरात,डॉ हर्षला वेदक (डीटीओ) डॉ पल्लवी तारळकर वैदयकीय अधीक्षक-गारगोटी श्रीमती संजिवनी कट्टी,कार्य अभियंतासार्व.बांधकाम विभाग (इलेक्ट्रिकल) कोल्हापूर, युवराज देसाई, आकाश प्रसाद आदी उपस्थित होते.
ते म्हणाले,भुदरगड सारख्या दुर्गम तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यसेवेत मोलाची भर घालणारे दोन महत्त्वाचे उपक्रम शासनामार्फत राबविण्यात येत आहेत.या उपक्रमामुळे येथील लोकांना नेत्र उपचारासाठी कोल्हापूरला जाण्याची आवश्यकता भासणार नाही.या ३० बेडच्या नेत्र रुग्णालयातील अत्याधुनिक उपकरणांमुळे नागरिकांना मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया सहज साध्य होणार आहे.नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
तसेच या ठिकाणी हृदयविकारावरील उपचारांसाठी अद्ययावत कॅथलॅब उभारण्यात येणार असून यासाठी सुमारे १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहितीही आरोयमंत्री श्री आबिटकर यांनी यावेळी दिली.
या नेत्र रुग्णालयात डोळ्याला स्पर्श न करता अत्याधुनिक IOL मास्टरद्वारे लेन्सचा (IOL) नंबर मोजणे,ऑपरेशननंतर येणारी जाळी काढण्यासाठी यॅग लेझर (YAG Laser) उपचार चष्म्याचा अचूक नंबर तपासणी, लहान मुलांच्या डोळ्यांची तसेच काचबिंदू तपासणी व उपचार,
काचबिंदूसाठी आवश्यक पेरिमेट्री चाचणी, ओसीटी (OCT) स्कॅन (रेटिना/डोळ्याच्या मागील पडद्याचे स्कॅन), टेरिजियम शस्त्रक्रिया (डोळ्यावरील मांस/पडदा काढणे), लासूर (नासूर) तपासणी व शस्त्रक्रिया तसेच डोळ्यांचा दाब तपासणी आदी सुविधा नेत्र रुग्णांसाठी या रुग्णालयामध्ये राबविण्यात येणार आहेत.
लवकरच कॅथलॅबची उभारणी करण्यात येणार असून यामध्ये १० आयसीयू बेड, सर्व इक्विपमेंटसह मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, अँजिओग्राफी (रक्तवाहिन्यांची तपासणी/एक्स-रे चित्रण) अँजिओप्लास्टी (अरुंद रक्तवाहिनी रुंद करण्याची प्रक्रिया) ASD दुरुस्ती (हृदयाच्या वरच्या दोन कप्प्यांमधील भिंतीतील छिद्र बंद करण्याची शस्त्रक्रिया) तसेच VSD दुरुस्ती (हृदयाच्या खालच्या दोन कप्प्यांमधील भिंतीतील छिद्र बंद करण्याची शस्त्रक्रिया) आदी सुविधा प्राप्त होणार आहेत. नेत्रविकार त्याचबरोबर हृदयविकारावरील आधुनिक उपचार आता जवळच उपलब्ध होणार असल्याने गारगोटी – भुदरगडसह पंचक्रोशीतील रुग्णांना उपचारासाठी आता शहरांकडे जावे लागण्याचा त्रास कमी होण्यार आहे. या कार्यक्रमास इतर पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

हिरेकुडी येथील ज्येष्ठ नागरिक जयपाल नरसप्पा बाळीकाई यांचे आकस्मिक दुःखद निधन.मलिकवाड येथील जैन मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या धार्मिक व दानशूर व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली!*

traffic tail

हिरेकुडी येथील ज्येष्ठ नागरिक जयपाल नरसप्पा बाळीकाई यांचे आकस्मिक दुःखद निधन.मलिकवाड येथील जैन मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या धार्मिक व दानशूर व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली!*

error: Content is protected !!