Edition

इस्रो प्रशिक्षणासाठी प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या १९ विद्यार्थ्यांची निवड!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

_डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या ‘कलाम स्ट्रीम चॅलेंज २०२६’मध्ये विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; श्रीहरिकोटा येथे प्रशिक्षणाची संधी_

सेलू : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘कलाम स्ट्रीम चॅलेंज २०२६’ ही स्पर्धा ११ ऑक्टोबर रोजी पिंपरी, पुणे येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू येथील तब्बल १९ विद्यार्थ्यांनी यश संपादन करत इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील प्रशिक्षणासाठी निवड मिळवली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे सेलूच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तंत्रज्ञानाची आवड, संशोधनवृत्ती आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याची चमक दाखवली. इस्रोसारख्या प्रतिष्ठित अंतराळ संशोधन संस्थेत प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक वाटचालीला नवी दिशा मिळणार आहे.इस्रो, श्रीहरिकोटा येथे १६ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
स्वराज राजहंस सुरवसे,
विराज राजहंस सुरवसे,समर्थ शरद शेळके,आयुष नितीन रासवे,अरहंत सरकटे,कुणाल अनिल बादाडे,आदित्य बाळासाहेब निर्वळ,कौस्तुभ सचिन शेळके,गोविंद रामेश्वर हाळणोर,विनय अनिल नागरे,सर्वज्ञ भाले,विराट काकडे,आयुष साळवे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे रोबोटिक्स शिक्षक शिवकुमार सोळंके, विज्ञान शिक्षक नारायण चौरे आणि संगणक शिक्षिका मानसी यादव यांनी मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनासोबतच विद्यार्थ्यांची मेहनत, जिज्ञासा आणि तंत्रज्ञानातील रुची यामुळे हे यश मिळाल्याचे सांगण्यात आले.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठान, सेलूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य सुबोध हिवराळे तसेच अनिल कुमार, अब्दुल बाशा, मीरा मिरांडा आणि इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून, या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

भीमाशंकर जंगलतोडीवरून राजकीय वातावरण तापले; टोरंट पॉवरच्या प्रकल्पावर पर्यावरणीय प्रश्न, ३ लाखांहून अधिक झाडे तोडली जाणार असल्याचा आरोप; कंपनी आणि वनविभागाकडून नियमांचे पालन केल्याचा दावा

‘माझी संस्कृती, माझा अभिमान’; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्यांची किल्ले उभारण्यासाठी धडपड! तारदाळ खोतवाडी मातीच्या किल्ल्यांतून साकारतोय शिवशाहीचा इतिहास; गड-किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी बालचमूंचा उत्साह

traffic tail

भीमाशंकर जंगलतोडीवरून राजकीय वातावरण तापले; टोरंट पॉवरच्या प्रकल्पावर पर्यावरणीय प्रश्न, ३ लाखांहून अधिक झाडे तोडली जाणार असल्याचा आरोप; कंपनी आणि वनविभागाकडून नियमांचे पालन केल्याचा दावा

‘माझी संस्कृती, माझा अभिमान’; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्यांची किल्ले उभारण्यासाठी धडपड! तारदाळ खोतवाडी मातीच्या किल्ल्यांतून साकारतोय शिवशाहीचा इतिहास; गड-किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी बालचमूंचा उत्साह

error: Content is protected !!