What is Jos Salvador Story in 438 days in Pacific Ocean

What is Jos Salvador Story

What is Jos Salvador Story in 438 days in Pacific Ocean जगातला सर्वात मोठा महासागर म्हणजे ‘प्रशांत(पॅसिफिक) महासागर’. पृथ्वीचा एक तृतीयांश भाग या महासागराने व्यापला आहे, तसेच जगातील सगळ्याच एकूण भूभागापेक्षाही प्रशांत महासागर मोठा आहे.

जर तुम्ही या महासागरामध्ये भरकटला तर तुम्हाला परत भूभाग दिसायची सुतराम शक्यता नाही. पण एका अवलियाच्या नावावर अपघाताने एक जागतिक विक्रम जमा झालेला आहे, जो मोडायची कोणाचीही इच्छा नसेल, तो म्हणजे समुद्रात हरवल्यावर सर्व शक्यतांच्या विरूध्द सर्वात जास्त दिवस जिंवत राहण्याचा विक्रम. आणि हा विक्रम करणारा अवलिया म्हणजे मेक्सिको मधील ‘जोस साल्वाडोर अल्वारेंगा ’. What is Jos Salvador Story

Also See : Upcoming Bollywood Movies

What is Jos Salvador Story

जोस मेक्सिकोमधील १ अनुभवी मच्छिमार होता . १७ नोव्हेंबर २०१२ साली तो व त्याचा १ साथीदार ‘इझिकिल कोरडोबा’ हे दोघ मेक्सिकोच्या पश्चिम तटावरील १ छोटस बंदर ‘कोस्टा अझुल’ येथून एका छोट्या नावेत प्रशांत महासागरात मच्छिमारी साठी गेले. त्यापुढील ३० तासात मच्छिमारी करून परतण्याचा त्यांचा इरादा होता, वरील चित्रात दाखवलीत तेवढी ती नाव (boat) होती, तिची लांबी फक्त ७ मीटर होती व नावेवर फक्त मोटर व पकडलेले मासे साठवण्यासाठी १ छोटा फ्रिज होता. What is Jos Salvador Story

What is Jos Salvador Story

तिथल्या हवामान विभागाने समुद्रात वादळ येण्याचा इशारा दिला होता पण जोस व त्याचा सहकारी यांना फक्त ३० तासासाठी मासेमारी करायची असल्यामुळे त्यांनी समुद्रात धाडस केले, त्यांना वाटल वादळ येण्याआधी आपण मासेमारी करून सुखरूप परत येऊ. तर ते तटापासून १२० किमी दूर खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले. तेथे गेल्यावर त्यांनी थोडा वेळ मासेमारी केली व वातावरण बिघडल्यामुळे त्यांनी परत जाण्याचा निर्णय घेतला.

नशिबाचा खेळ

पण जोस ला पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नव्हती, परतीच्या प्रवासात रात्री १ वा त्यांना वादळ येऊन धडकले, तर त्या वादळात यांची छोटीशी नाव हेलकावे खाऊ लागली व त्यांच्या नावेत सगळीकडे पाणी पसरून हळूहळू नाव बुडायला लागली. त्यामुळे नावेवरील वजन हलक करण्यासाठी त्यांनी आतापर्यंत जेवढी मासेमारी केली होती ते सगळे मासे समुद्रात परत फेकून दिले. ते तटापासून ६ तासांच्या अंतरावर होते त्यामुळे त्यांनी तेथे अडकून मरण्यापेक्षा वादळातून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. सकाळी ७ वाजेपर्यंत त्यांनी नाव चालवल्यानंतर ते त्यांच्या बंदरापासून फक्त २४ किमी दूर राहिले होते व त्यांना तेथून डोंगरही दिसू लागले होते व त्यांच्या नावेमधील रेडियो चालू होता, त्यांनी त्याद्वारे त्यांच्या मालकाला त्यांच लोकेशन सांगून ते येत आहेत अस सांगितल. पण तिथे त्यांच्या दुर्दैवाने त्यांची मोटर खराब झाली, व नाव एकाजागी थांबली, नाव पूर्ण स्वयंचलित असल्यामुळे त्या नावेत नाव हाकण्यासाठी वल्हे(oar) तसेच पॅंडल्सही नव्हते. आपण म्हणतो ना ‘दुष्काळात तेरावा महिना’ त्याप्रमाणे त्यांच्या चालू असलेल्या रेडियोचीही बॅटरी संपली, आता मात्र त्यांच्याकडे हताश किनार्याकडे बघण्याशिवाय पर्याय नव्हता.

आता जोस व इझिकिल यांचा नावेवर कसलाच ताबा न राहिल्याने वादळ जिकडे नेईल तिकडे ती नाव जाऊ लागली. व वादळ नावेला अजून समुद्रात ढकलू लागल. ते दृष्टीक्षेपात आलेले डोंगर हळूहळू परत दिसेनासे झाले. २-३ दिवस गेल्यावर इकडे जोस व इझिकिलचे कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी नावेच्या मालकावर दबाव टाकला. त्या दोघांच शेवटच बोलण झाल होत त्या लोकेशनवर नावमालकाने १ शोधपथक पाठवले, शोधपथक त्या भागात काही दिवस त्यांचा कसून शोध घेतला पण वादळामुळे जोस ची नाव लांब समुद्रात गेली. जेव्हा त्यांची नाव समुद्रात ४५० किमी गेली तेव्हा कुठ समुद्र शांत झाला. नाव अतिशय लहान असल्याने जोस ला जाणीव होती की समुद्रात शोध घेणार्या हेलिकाॅप्टर वा विमानातून आपण दिसणार नाही. What is Jos Salvador Story

थोड्याच दिवसात त्यांच्या नावेवरचा अन्यसाठा संपला होता तर त्यांनी छोटे मासे व समुद्रालगत उडणारे छोटे पक्षी यांची शिकार करून खाऊ लागले, तसेच त्यांना २-३ तरंगत्या प्लास्टिकच्या बाटल्या भेटल्या ते त्या बाटल्यांमध्ये पावसाच पाणी साठवून त्यांनी ते पाणी पिण्यासाठी वापरल . आणि जेव्हा बरेच दिवस पाऊस पडला नाही तेव्हा त्यांनी स्वत:च पकडलेल्या कासवाच रक्त प्यायल व ते ही संपल तेव्हा स्वत:च मुत्र प्यायला सुरवात केली.

दिवसांमागून दिवस जात होते, विचार करा १ छोटीशी नाव संपूर्णपणे पाण्याने वेढलेले, त्यात तुम्ही व तुमचा १ मित्र. बोलून बोलून तरी किती बोलणार. शेवटी वेळ घालवायला एक तर पाण्यात हात घालून शिकार करणे किंवा झोप काढणे, एकामागून एक असे ४ महिने गेले. इझिकील कोरडोबा आता धीर सोडायला लागला होता, तो सततच्या अपचनी खाण्याने आजारी पडला. नंतर त्याने काहीही खाण्यास व पिण्यास मनाई केली व उपासमारीने त्याचा मृत्यू झाला. व आता जोस अल्वारेंगा एकटाच संपूर्ण समुद्रात एकटाच राहिला .

Centre of pacific Ocean

वरील फोटोमध्ये जोस चा एकट्याने प्रवास कुठून सुरू झाला ते ठिकाण दाखवल आहे. प्रशांत महासागराचा हा मध्य भाग अतिशय दुर्मिळ आहे , मोठी जहाज सुध्दा कधीतरी या मार्गाचा अवलंब करतात. जोस सल्वाडोरने नंतर असा दावा केला की त्याच्या अगदी जवळून १ मालवाहू जहाज गेल, याने जिवाच्या आकांताने ओरडून त्यांच लक्ष वेधल, त्या जहाजावरच्या ४ लोकांनी त्याला लांबून हातही(wave) दाखवला पण थांबले नाहीत. विचार करा तुम्ही महिनोंमहिने एकटे आहात आणि मदत तुमच्या जवळून निघून गेली तर किती राग येईल.

आता जोस सल्वाडोरचा साथीदार जाऊन ११ महिने झाले होते. त्याची नावेने ८००० किमीचा प्रवास केला होता, म्हणजे जोस एकटाच त्या छोट्याश्या नावेवर एवढा काळ होता. त्याच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या फक्त १ स्वेटर काय तो टिकला होता. त्याच्या दाढी व केसांमध्ये मोठी वाढ झाली होती. आता त्याची पण प्रकृती बिघडू लागली होती. What is Jos Salvador Story

समुद्र प्रवासाचा शेवट

४३८ दिवस समुद्रात त्या छोट्याश्या नावेत प्रवास केल्यानंतर मग तो दिवस उजाडला ३० जानेवारी २०१४ जोस ला समुद्रात आजूबाजुला नारळ दिसू लागले व कमी पल्ल्याचे पक्षी त्याच्या नावेवर बसू लागले, तेव्हा त्याला जाणीव झाली की किनारा जवळ आलाय.त्याला आधी वाटल की हे मानवविरहित बेट आहे पण नंतर जवळ गेल्यावर त्याला घर दिसल, त्याच्या नावेला वल्हे, पॅंडल्स नसल्यामुळे योग्य जागी जायला जवळपास अर्धा दिवस लागला. एवढ्या दिवसाच्या महाप्रयासानंतर त्याला किनारा लागला होता, जसा किनारा जवळ आला त्याने नावेबाहेर उडी मारून जीवाच्या आकातांने पळत सुटला. व त्याला जे घर दिसल होत त्या घराचा दरवाजा ठोठावला व आतून माणूस बाहेर आला. याने त्याची पहिली गळाभेट घेतली, मेक्सिकोचा तट सोडल्यापासून त्याचा साथीदार वगळता त्याला झालेला हा मानवजातीचा पहिला स्पर्श होता. तो ज्या बेटावर गेला ते मार्शल बेट श्रृंखलेतल सर्वात छोट बेट ‘इबाॅन ॲटाॅल’. जर त्याने हे बेट चुकवले असते तर पुढचा स्टाॅप थेट फिलिपाईन्स बेटाचाच होता, ते तिथून ५००० किमी दूर होत, त्याला अजून २४० दिवस त्या छोट्या बोटीत प्रवास करावा लागला असता. What is Jos Salvador Story

ebon atoll

वरील चित्रात असल्याप्रमाणे जो मध्ये बिंदू दिसतोय ते ‘इबाॅन ॲटाॅल’ बेट त्याच्या मदतीला धावून आले.

नंतर त्याला मेक्सिकोमधील त्याच्या ‘इल साल्वाडोर’ या मूळ शहरी विमानाने परत पाठवण्यात आले. ११ दिवस तो इस्पितळात होता.

Josh in Hospital

जोस नंतर खूप लोकप्रिय झाला , त्याची खूप लोकांनी मुलाखत घेतली, नंतर त्याच्या थरारक तग धरणार्या प्रवासावर ‘ 438 Days: An Extraordinary True Story of Survival at Sea‘ . हे पुस्तक आल. What is Jos Salvador Story

त्याच पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर थोड्याच दिवसात इझिकिल कोरडोबा च्या कुटुंबाने त्याच्यावर १० दशलक्ष डाॅलरचा दावा दाखल केला व आरोप केला की जोस ने प्रवासा दरम्यान कोरडोबाला मारून खाल्ल . अजूनही त्याचा निर्णय आलेला नाहीये. What is Jos Salvador Story

पण एक फक्त ७ मीटर लांबीची नाव, त्यात ८००० किमीचा अपघाताने घडलेला थरारक प्रवास, जीव वाचवण्याची धडपड, साथीदार गेल्यानंतरही ११ महिने एकट्याने एवढ्या मोठ्या समुद्रात जिंवत राहणे म्हणजे ‘चमत्कार’ च आहे.

Story Written By : Snehal Pawar 

Published By : Vishalkranti Team

1 thought on “What is Jos Salvador Story in 438 days in Pacific Ocean”

  1. Now this ETHEREUM double your ETHEREUMs. Double Your ETHEREUM Free. Ledger offers the most safe wallets for ETHEREUM, Ethereum, Ripple and other cryptocurrencies.

    Reply

Leave a Comment